दादर रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून ‘गदा’रोळ, राजकीय वातावरण तापलं
मध्य रेल्वेकडून पाठवण्यात आलेल्या हनुमान मंदिराच्या नोटिशीनंतर विरोधकांनी आक्रमक होत मंदिराच्या पाडकामाला विरोध केला होता. इतकंच नाहीतर दादरच्या हनुमान मंदिराच्या पाडकामावरून चांगलंच राजकारण तापलंय
दादर येथील हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती देण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून दादर रेल्वे स्टेशन जवळील हनुमान मंदिराला पाडण्याची नोटीस देण्यात आली होती. दरम्यान, मध्य रेल्वेकडून पाठवण्यात आलेल्या हनुमान मंदिराच्या नोटिशीनंतर विरोधकांनी आक्रमक होत मंदिराच्या पाडकामाला विरोध केला होता. इतकंच नाहीतर दादरच्या हनुमान मंदिराच्या पाडकामावरून चांगलंच राजकारण तापलंय. ८० वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती. हनुमान मंदिराच्या नोटिशीनंतर विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आणि भाजपने केलेल्या रेल्वे प्रशासनाच्या चर्चेनंतर अखेर मंदिराच्या पाडकामाला स्थगिती देण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी मध्य रेल्वेकडून हनुमान मंदिराला पाडण्याची नोटीस देण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. त्यामुळे याच मंदिरात काल सकाळपासूनच राजकीय नेत्यांनी आरती करत एकच गर्दी केली होती. मात्र ज्यावेळी किरीट सोमय्या हनुमानाची आरती करण्यासाठी त्या मंदिरात दाखल झालेत. तेव्हा ठाकरे गटाकडून गोंधळ घालण्यात आला. सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाले होते. बघा नेमकं काय होतं वातावरण?