Ajit Pawar | बारामतीकरांना भल्या पहाटे काम करण्याची सवय शरद पवारांमुळे लागली : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात झाली आहे. बारामती नगरपरिषदेच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले आहेत. यावेळी नव्याने बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलाची अजित पवार यांनी माहिती घेतली.

“गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचं संकट आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींना मर्यादा आल्या आहेत. या काळातही विकासकामे सुरु आहेत. बारामतीत अनेक कामे सुरु आहेत. बारामतीकरांचं प्रेम, पाठिंबा आणि पवारसाहेबांचे आशीर्वाद यामुळे हे सगळं होतंय. आम्हाला बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरु करायची सवय लागलीय. पवारसाहेबांमुळे ही सवय लागलीय. आता अनेकजण त्यामुळं थोडं दबकतात की हा बाबा कधी येईल याची शाश्वती नाही. मुद्दाम कुणाला तरी त्रास द्यायचा अशी भुमिका नसते.. लवकर काम सुरु केलं की इतर कामांनाही वेळ देता येतो” असं ते यावेळी म्हणाले.