VIDEO : आपण काय बोलतो, याचं तारतम्य बाळगायला हवं; अजित पवारांचा टोला

VIDEO : आपण काय बोलतो, याचं तारतम्य बाळगायला हवं; अजित पवारांचा टोला

| Updated on: Dec 10, 2021 | 9:09 PM

भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता व नंतर जामिनावर सुटकाही झाली. यावर अजित पवार यांनी शेलारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मुंबई शहराच्या प्रथम नागरिकाच्या बाबतीत आपण काय बोलतो, याचं भान ठेवायला हवं. ते काय बोलतेत हे सर्वांसमोर आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांच्यावर टीका केली. आपली एक परंपरा आहे. आपण महिलांचा आदर करतो. सुसंस्कत महाराष्ट्र म्हणतो, अशावेळी विचार करून बोलायला हवे. महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी याविरोधात तक्रार केली, तर तिथं मात्र राजकारण केलं असल्याचा आरोप त्यांनी केला, हे चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.

Published on: Dec 10, 2021 09:07 PM