कसं तुम्हाला काहींनी सांभाळलं,तुम्ही पेशन्स अजिबात ठेवत नाही!- Ajit Pawar

| Updated on: Mar 25, 2022 | 8:32 PM

विरोधकांनी धानाबाबत एकरी धानाबाबत काही मागणी केली होती. हरकत नाही. एकरी काढण्याच्या संदर्भात आम्ही सूचना केल्या आहेत. तुम्ही थोडंही पेशन्स ठेवत नाही. तुम्हाला कसं काहींनी संभाळलं कुणास ठावूक?, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज सभागृहात (vidhan sabha) भाजप (bjp) नेत्यांची पोलखोल करत त्यांची चांगलीच गोची केली. धानाच्या संदर्भात मागणी करण्याचं एक निवेदन भाजपने दिलं होतं. या निवेदनात भाजप नेत्यांनी डबल डबल सह्या केल्या होत्या. अजित पवार यांनी या सह्या कशा डबल झाल्या आहेत हे दाखवून दिलं. तसेच आमदारांची नाव डबल टाकून यादी वाढवण्याची भाजपची शक्कलही उघडी पाडली. तसेच या यादीत ज्या आमदारांची नाव होती, त्यातील 30 ते 35 टक्के आमदार आमच्याकडूनच तुमच्याकडे गेलीत असं सांगून अजितदादांनी विरोधकांची फिरकीही घेतली. हे सांगताना अजितदादांनी थेट विरोधकांची नावही घेतली. अजितदादांनी पोलखोल केल्यावर भाजप आमदारांनी त्यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. तेव्हा चुकलं ते चुकलं हे मान्य करा. डबल सह्या करून आकडा वाढवण्याचा प्रयत्न झालाय, असं सांगत विरोधकांना सुनावलेही. विरोधकांनी धानाबाबत एकरी धानाबाबत काही मागणी केली होती. हरकत नाही. एकरी काढण्याच्या संदर्भात आम्ही सूचना केल्या आहेत. तुम्ही थोडंही पेशन्स ठेवत नाही. तुम्हाला कसं काहींनी संभाळलं कुणास ठावूक?, असा टोलाही त्यांनी लगावला.