पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं आता मुख्यमंत्रिपदही? देवेंद्र फडणवीस यांना नेमकं सांगायचंय काय?

पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं आता मुख्यमंत्रिपदही? देवेंद्र फडणवीस यांना नेमकं सांगायचंय काय?

| Updated on: Oct 06, 2023 | 11:57 AM

tv9 Special Report | उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनाप्रमाणं पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं आणि आता पुन्हा मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या बड्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता भाजपच्या मनात अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री? आहेत का?

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनाप्रमाणं पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं आणि आता पुन्हा मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा सुरु झाली आहे. कारण भाजपच्याच नेत्यांकडून अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख होत असल्याचे पाहायला मिळत आहे. फडणवीसांनीही दादा कधी तरी मुख्यमंत्री होतील, त्यासाठी शुभेच्छा त्यांच्या पाठीशीच आहेत असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या मनात, अजित पवारच मुख्यमंत्री आहेत का? अशी चर्चा सुरु झाली आहे त्याचं कारण आहे, भाजपच्या 3-3 दिग्गजांनी तसा उल्लेख केला आहे. आधी लंडनमध्ये सुधीर मुनगंटीवार म्हणालेत की, पुढचे मुख्यमंत्री अजित पवार, नंतर बावनकुळे म्हणालेत की, राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार आणि आता फडणवीसांनी तर पूर्ण 5 वर्षांसाठी दादांना मुख्यमंत्री करु असे म्हटले इतकेच नाही तर आमच्या शुभेच्छाही त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगून आणखी भर घातली. फडणवीसांनी तर आणखी स्पष्टता आणत दादा मोठे नेते असून कधी ना कधी संधी मिळेल हेही सांगितलं. पण तूर्तास शुभेच्छा शिंदेंच्याच पाठीशी भक्कम असल्याचंही सांगायला ते विसरले नाहीत. बघा नेमकं काय म्हणाले फडणवीस?

Published on: Oct 06, 2023 11:57 AM