अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पहिल्यांच केले पंतप्रधानांचे स्वागत!
यावेळी त्याच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कृषी महाविद्यालय परिसरातील हेलिपॅडवर उपस्थित होते.
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. त्याच्याआधी पंतप्रधान मोदी यांचे आज सकाळी पुण्यात आगमन झाले. यावेळी त्याच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कृषी महाविद्यालय परिसरातील हेलिपॅडवर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील त्यांचे स्वागत केले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्या हे पहिल्यांदा केललं स्वागत आहे. तर या स्वागतानंतर पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे श्रीं’ची आरती आणि अभिषेकसाठी गेले. तर यानंतर त्याना टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. तर यानंतर त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्धाटन देखील होणार आहे.