Ajit Pawar | महाराष्ट्रातील निर्बंधांबाबत नेमकं काय म्हणाले अजित पवार?
मुंबईत होणाऱ्या या बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, असा अंदाज वर्तवला जातो आहे. बुधवारी होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
पुणे : पुण्यात (Pune) बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य पातळीवर महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govenrment) काय निर्णय घेणार आहे, आणि हे निर्णय केव्हा घेतले जाणार आहेत, याची माहिती दिली. पुण्यात अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत उद्या राज्यातील मंत्र्यांची बैठक होणार आहे. सकाळी 9 वाजत ही बैठक पार पडले. या बैठकीत राज्यपातळीवर काय निर्बंध आणि नियमावली जारी करायची, याबाबचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, असा अंदाज वर्तवला जातो आहे. बुधवारी होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. मात्र अजूनही म्हणावी तशी गर्दी कमी होत नसल्यामुळे आता बुधवारी होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाच असणार आहे.