Nagpur | उपमुख्यमंत्री ‘दादां’चा ठाकरे सरकारला विसर पडला?, राज्याच्या परिपत्रकात उल्लेखच नाही
महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री आणि दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा सरकारला विसर पडलाय. राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात कन्नमवार यांच्या पुन्यतिथीचा जयंतीचा आणि जयंतीचा उल्लेख नाही. त्यामुळे कर्तुत्ववान विदर्भपुत्राचा राज्य सरकारला विसर पडलाय की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.
महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री आणि दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा सरकारला विसर पडलाय. राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात कन्नमवार यांच्या पुन्यतिथीचा जयंतीचा आणि जयंतीचा उल्लेख नाही. त्यामुळे कर्तुत्ववान विदर्भपुत्राचा राज्य सरकारला विसर पडलाय की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्य सरकारकडून राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्तीची पुन्यतिथी आणि जयंतीचं परिपत्रक काढण्यात येतेय. दरवर्षी हे परिपत्रक प्रकाशित करण्यात येतेय. पण शासनाच्या परिपत्रकात महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा उल्लेख नाही. कन्नमवार यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे. येत्या १० तारखेला कन्नमवार यांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या नावाचे नव्यानं परिपत्रक काढावे, अशी मागणी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार समितीने केलीय.
Latest Videos