Maharashtra Politics : फडणवीस यांच्या टीकेवर काँग्रेस नेत्याचा पलटवार; म्हणाला, ‘फडणवीस घाबरलेत…’
त्यांनी विरोधकांवर टीका करताना, विरोधी पक्षांची बैठका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी नाही तर घराणेशाहीचे राजकारण वाचवण्यासाठी सुरू असल्याचा घणाघात केला होता.
अकलूज (सोलापूर) : पटणा येथे झालेल्या बैठकिवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले होते. त्यांनी विरोधकांवर टीका करताना, विरोधी पक्षांची बैठका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी नाही तर घराणेशाहीचे राजकारण वाचवण्यासाठी सुरू असल्याचा घणाघात केला होता. त्यावरून काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी फडणवीस घाबरले आहेत म्हणून असं बोलत आहेत असा पलवार केला आहे. तर जेव्हा केंद्रातील मोदी सरकार गेलं की सीबीआय, ईडी कशी कामं करेल याची चिंता त्यांना सतावत आहे. कारण सरकार गेलं की त्यांना त्रास होईल अशी भीती त्यांना आहे. तर ते विरोधकांच्या एकजूटीमुळे घाबरले आहेत असे त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 24, 2023 12:32 PM