Ajit Pawar | माझ्यावरील आरोप खोटा, ‘त्या’ याचिकेशी माझा संबंध नाही : अजित पवार
राज्य सहकारी बँकेवर EDची छापेमारी अशी बातमी मीडियात चालली. मात्र अशी कुठलीही घटना घडली नाही, असं अजित पवार म्हणाले. धादांत खोट्या बातम्या आहेत, मात्र मी कायदेशीर कारवाई करणार नाही. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास उडत चालला आहे, असं अजित पवार म्हणाले.
राज्य सहकारी बँकेवर EDची छापेमारी अशी बातमी मीडियात चालली. मात्र अशी कुठलीही घटना घडली नाही, असं अजित पवार म्हणाले. धादांत खोट्या बातम्या आहेत, मात्र मी कायदेशीर कारवाई करणार नाही. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास उडत चालला आहे, असं अजित पवार म्हणाले. काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो. मी 40 वर्षे राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले.
राजू शेट्टी यांचा पत्ता कट आणि हेमंत टकले यांना संधी याही बातम्या कुठून येतात कळत नाही, त्यामुळे बातम्या देताना काळजीपूर्वक द्या, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.
Latest Videos