पुरात अडकलेल्या युवकांना बाहेर काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी पुढे सरसावले, नदीपात्रात उतरुन तरुणांना जीवनदान
पुरात अडकलेल्या दोन युवकांना वाचवण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्वतः नदीपात्रात उतरले.
नांदेड : पुरात अडकलेल्या दोन युवकांना वाचवण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्वतः नदीपात्रात उतरले. भोकर तालुक्यातील जामदरी गावातील संबंधित घटना आहे. गावातील अर्जुन तमम्मलवाड आणि धमपाल कसबे हे युवक पुराच्या पाण्यात अडकले होते. गुराखी असलेल्या या दोन्ही युवकांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला साकडे घातले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे सुरक्षा पथकासह घटनास्थळी धावले. यावेळी जलतरणपटू यायला वेळ लागल्याने स्वतः खंदारे पाण्यात उतरले आणि दोरीच्या मदतीने अडकलेल्या दोन्ही युवकांना सुखरुप बाहेर काढले.
Published on: Jul 24, 2021 10:36 PM
Latest Videos