Eknath Shinde : विकास कामाने उत्तर देण्याचा प्रयत्न, अन्यथा खोके कोठून येतात अन् कुठे जातात याचा खुलासा होईल, मुख्यमंत्र्यांचा रोष कुणावर?

Eknath Shinde : विकास कामाने उत्तर देण्याचा प्रयत्न, अन्यथा खोके कोठून येतात अन् कुठे जातात याचा खुलासा होईल, मुख्यमंत्र्यांचा रोष कुणावर?

| Updated on: Aug 30, 2022 | 10:59 PM

आतापर्यंत ठीक होते पण यापुढे कोणतेही आरोप सहन न करता सर्वकाही खुलासे केले जातील असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. आपल्याला आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत पण खालच्या पातळीवर टीका होत असेल तर मात्र, खोके कोठून येतात आणि कुठे जातात हे ही आपल्याला माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा रोष कुणावर होता हे आता नव्याने सांगायची गरज नाही.

मुंबई : सध्या सत्तेवर आलेले (Shiv Sena) शिवसेना-भाजप युतीचे सरकार यापूर्वीच सत्तेत आले असते तर (Development work) विकास कामांचा झपाटा कायम राहिला असता असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवाय हेच सरकार जनतेला अपेक्षित होते म्हणूनच अल्पावधीतच आम्हाला जनतेने स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. बंडानंतर ते आतापर्यंत शिवसेनेकडून (Eknath Shinde) शिंदे गटावर टीका केली जात आहे. पण आतापर्यंत ठीक होते पण यापुढे सहन न करता सर्वकाही खुलासे केले जातील असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. आपल्याला आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत पण खालच्या पातळीवर टीका होत असेल तर मात्र, खोके कोठून येतात आणि कुठे जातात हे ही आपल्याला माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा रोष कुणावर होता हे आता नव्याने सांगायची गरज नाही.

Published on: Aug 30, 2022 10:58 PM