...ते भैरवनाथ बघून घेईल; राष्ट्रवादीच्या नेत्याची नाव न घेता हर्षवर्धन पाटलांवर टीका

…ते भैरवनाथ बघून घेईल; राष्ट्रवादीच्या नेत्याची नाव न घेता हर्षवर्धन पाटलांवर टीका

| Updated on: Apr 14, 2023 | 9:38 AM

माजी मंत्री विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी या तालुक्यात विकासाची काम मी करतो. मात्र त्याचं श्रेय कोणी दुसरचं घेऊन जातो असा टोला माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे

इंदापूर : तालूक्यात जिल्ह्यात आणि राज्यात देखील विकास कामांच्या श्रेयवादावरून लढाई होताना दिसते. त्यामुळे अनेक ठिकाणी आरोप-प्रत्यारोप होताना दिसते. असेच आरोप, टीका आता इंदापूरात ही पहायला मिळत आहे. येथे दोन माजी मंत्र्यांमध्ये श्रेयवादावरून लढाई रंगल्याचे पहायला मिळत आहे. माजी मंत्री विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी या तालुक्यात विकासाची काम मी करतो. मात्र त्याचं श्रेय कोणी दुसरचं घेऊन जातो असा टोला माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे. तर भैरवनाथ बघून घेईल कुणाचे काय करायचं ते असेही ते म्हणाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या इंदापूरच्या दौऱ्यावर होत्या.

Published on: Apr 14, 2023 09:37 AM