स्वाभिमानी पक्षातून हकालपट्टीनंतर Devendra Bhuyar यांची tv9 मराठीवर पहिली प्रतिक्रिया
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) हे संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुरूवारी देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी यांनी टीकाही केली.
अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) हे संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुरूवारी देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी यांनी टीकाही केली. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला असे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना पक्षातून काढताच काही वेळातच देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) केली आहे. “धन्यवाद’ अशा आशयाचा मजकूर देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट मध्ये केला आहे. देवेंद्र भुयार यांनी धन्यवाद अशा आशयाचा स्टेटस अनेक सोशल मीडियावर ठेवला आहे. अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे संघटनेचं कुठल्याही कामात सहभागी होत नसल्याने त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे.