पुढील निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीलाच मतदान देणार : देवेंद्र भुयार
यापुढे देखील महाविकास आघाडीला मतदान करीत राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याची ओरड भाजपाचे नेते करीत आहेत.
मुंबई – राज्यसभेची निवडणुक झाल्यापासून संजय राऊत यांनी थेट अपक्ष आमदार आणि काही छोट्या पक्षातील आमदारांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केल्याने त्यांचा सहावा उमेदवार निवडून आला आहे. त्याचबरोबर त्यांनी काही आमदारांची नावं जाहीर केल्याने आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री भेटत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. अजित दादांकडे वेळ मागितला तर ते तात्काळ भेटतात असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं. मी महाविकास आघाडीला मतदान केलं आहे. यापुढे देखील महाविकास आघाडीला मतदान करीत राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याची ओरड भाजपाचे नेते करीत आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे बहुमत नसल्याचं देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल सांगितलं.