VIDEO : Devendra Fadanvis यांनी भाजपच्या आमदार Mukta Tilak यांची घेतली भेट

VIDEO : Devendra Fadanvis यांनी भाजपच्या आमदार Mukta Tilak यांची घेतली भेट

| Updated on: Jun 20, 2022 | 12:38 PM

आज राज्यात विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. त्याची लगबग सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे. अनेक आमदार तर दोन दिवसांपासून मुंबईत आहे. पक्षाने बोलावल्याने त्यांचा मुक्काम मुंबईत आहे. दरम्यान, भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक आजारी असून सध्या रुग्णालयात आहेत. मात्र अशा अवस्थेतही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान केले होते. विधानपरिषदेसाठीही आपण येणार असल्याचे त्यांच्याकडून अगोदरच सांगण्यात आले होते.

आज राज्यात विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. त्याची लगबग सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे. अनेक आमदार तर दोन दिवसांपासून मुंबईत आहे. पक्षाने बोलावल्याने त्यांचा मुक्काम मुंबईत आहे. दरम्यान, भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक आजारी असून सध्या रुग्णालयात आहेत. मात्र अशा अवस्थेतही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान केले होते. विधानपरिषदेसाठीही आपण येणार असल्याचे त्यांच्याकडून अगोदरच सांगण्यात आले होते. तर आज त्या विधानपरिषदेसाठी मतदान करण्यासाठी विधान भवनामध्ये आल्या होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन आदी उपस्थित होते. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांनाही मतदान करण्यासाठी सहाय्यक वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आयोगाने ही परवानगी दिल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले.

Published on: Jun 20, 2022 12:37 PM