“नाना पटोले, संजय राऊत बोलघेवडे लोक”, फडणवीस यांचं प्रत्युत्तर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ झाल्यावर हे सरकार पडेल, असा मोठा दावा केला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.
अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ झाल्यावर हे सरकार पडेल, असा मोठा दावा केला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अहमदनगरमधील शेती, विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “नाना पटोले आणि संजय राऊत हे बोलघेवडे लोकं आहेत”. तसेच पत्रकारांनी संजय राऊत यांच्यावरील प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीस यांनी कोण संजय राऊत असं वक्तव्य केलं आहे. “कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यात वाद आहे, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, “असे काहीही नाही. आणि असे काही असेल तर मी बसलेलो आहे. त्यांच्यात समन्वय घडवून आणला जाईल. दुसरी बाब म्हणजे वाद असला तरी वादळ नाही, एवढे मात्र नक्की आहे”.