कोरोना काळात सेनेच्या अनेक शाखा बंद होत्या, मात्र भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर मदत करत होता : फडणवीस

कोरोना काळात सेनेच्या अनेक शाखा बंद होत्या, मात्र भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर मदत करत होता : फडणवीस

| Updated on: Dec 12, 2021 | 7:15 PM

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय. भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंती निमित्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार टीका केलीय.

मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय. भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंती निमित्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार टीका केलीय. आताचं सरकार एकही नवीन काम करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचं काम पूर्ण झालं असतं. कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ता थांबला नाही. तो रस्त्यावर उतरून मदत करत होता, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

गोपीनाथ मुंडे हे गरीबांचे आणि वंचितांचे नेते होते. ओबीसींना आवाज आणि नेता मुंडे यांनी दिला. मोदींनी नेहमी गरीबाचा विचार केला. 2011 मध्ये आपण पोट माळ्याचा निर्णय घेतला. हे नविन सरकार नुसते घोषणा करतं. गोपाळ शेट्टी यांनी सरकारविरोधात लढा चालू केला तो आपण जिंकू. आताचं सरकार नवीन काही करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचं काम पूर्ण झालं असतं. त्यांना एक रेघही पुढे ओढता येत नाही. ते जमत नसेल तर आम्ही सुरु केलेली कामं थांबवू नका. कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या, त्यावेळी भाजपचा कार्यकर्ता थांबला नाही, तो रस्त्यावर मदत करत होता, असं फडणवीस म्हणाले.