उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
ठाण्यातील कासारवडवली येथील मैदान मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्यासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो तीनच्या कामात उद्धव ठाकरे यांनी खोडा घतल्याचा आरोप केला.
विविध योजनांचे उद्घाटन करण्यास पंतप्रधान आपल्यात उपस्थित राहीले आहे हे आपले भाग्य आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथील झालेल्या कार्यक्रमात सांगितले. कोणाच्या तरी गर्वाचे हरण करणारी मेट्रो थ्री आहे. या मेट्रोला महाविकास आघाडीने रोखले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की ही मेट्रो ग्रीन एनर्जीला चालना देणारी असल्याचे सांगितले. तरीही उद्धव ठाकरे यांचा कोणता इगो दुखावला माहिती नाही त्यांनी या मेट्रोच्या कामाला स्थिगिती दिली असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते पुढे म्हणाले की या मेट्रो करिता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले.अत्यंत वेगाने या मेट्रोचे काम आम्ही पूर्ण केले. आज मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे. मेट्रो तीनचे काम नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले. मोदी यांच्या जपानशी असलेल्या मैत्रीमुळे जपानच्या जायकाने मेट्रो तीनला कर्ज दिल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.