Special Report | Devendra Fadnavis यांचा ठाकरे सरकारवर video bomb -Tv9
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत 'पेनड्राईव्ह बॉम्ब' टाकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलीय. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ टाकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलीय. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय. अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अनिल गोटे, एकनाथ खडसे, जयकुमार रावल, हेमंत नगराळे आदींबाबत विशेष सरकारी वकिलांच्या व्हिडीओमधील संवाद फडणवीसांनी वाचून दाखवलाय.
Latest Videos