Special Report | भाजप आणि मनसे युतीचं पाऊल पुढे पडणार?
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस आज अचानक राज ठाकरे यांच्या घरी आले. ही कौटुंबीक भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कौटुंबीक भेट असली तरी या भेटीत राजकीय गप्पा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. फडणवीस यांच्यासोबत अमृता फडणवीसही आहेत. मात्र, या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस आज अचानक राज ठाकरे यांच्या घरी आले. ही कौटुंबीक भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कौटुंबीक भेट असली तरी या भेटीत राजकीय गप्पा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात हे दोन्ही नेते हास्यविनोद करताना दिसत आहेत.
Latest Videos