अशोक चव्हाण भाजपात... तर देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' मोठ्या दाव्यानं काँग्रेसला बसणार आणखी झटका?

अशोक चव्हाण भाजपात… तर देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ मोठ्या दाव्यानं काँग्रेसला बसणार आणखी झटका?

| Updated on: Feb 14, 2024 | 11:46 AM

विकासाची विचारधारा मान्य असलेले अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने विकासासाठी भाजपमध्ये आल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. भाजप प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या राज्यसभेचा मार्गही मोकळा झालाय

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या अशोक चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मुंबईच्या भाजप कार्यालयात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. तर विकासाची विचारधारा मान्य असलेले अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने विकासासाठी भाजपमध्ये आल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. भाजप प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या राज्यसभेचा मार्गही मोकळा झालाय. तर अशोक चव्हाण यांच्या राज्यसभेची खासदारकी जवळपास निश्चित आहे. अशोक चव्हाण सांगतात देवेंद्र फडणवीस जे सांगतील ती कामं करणार….तर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पातळीचे नेते म्हणून खासदारकीचे संकेतही दिलेत. तर अशोक चव्हाण यांच्या भाजपच्या प्रवेशाने पक्षाला किती फायदा? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 14, 2024 11:46 AM