राज्यात अपहरण झालेल्या मुलींची संख्या जास्त का? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण
अधिवशेनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तर विरोधकांच्या प्रश्नांवर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत गुन्ह्यांचं प्रमाण कमी असल्याची माहिती सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर, २० डिसेंबर २०२३ : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस. अधिवशेनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तर विरोधकांच्या प्रश्नांवर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत गुन्ह्यांचं प्रमाण कमी आहे. मुंबईत रात्री 12 वाजताही मुली फिरु शकतात, असे त्यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, गेले दोन-तीन अधिवेशन हरवलेल्या मुली, अपहरण झालेल्या मुली आणि स्त्रिया यांचा विषय सातत्याने येतोय. हा विषय असा मांडला जातोय की जणू हे सरकार आल्यापासून या घटना वाढल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे कुठलीही मुलगी घरातून निघून गेली, तर आपल्याला अपहरण या सदराखाली नोंद घ्यावी लागते. त्यामुळे आपण ते नोंद घेतो. पण मुली परतण्याचं प्रमाणही तितकीच आहे. महाराष्ट्रात सरासरी 4 हजार मुली आणि 64 हजार महिला बेपत्ता आहेत. महिला आणि मुली परत येण्याचं प्रमाणही वाढलं आहे. हे प्रमाण महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी असल्याचेही फडणवीसांनी सांगितलं.