अशोक चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? त्याने किती फायदा? फडणवीस थेटच म्हणाले….
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. दरम्यान, अशोक चव्हाण यांना भाजपात घेण्याची रिस्क का घेतली असा सवाल फडणवीसांना केला असता त्यांनी म्हटले, अशोक चव्हाणांवर आरोप झाले ते आमच्या काळात झाले नाही. त्यांच्याच काळात झाले.
मुंबई, १ मार्च २०२४ : अशोक चव्हाण यांनी गेल्या काहीच दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. दरम्यान, अशोक चव्हाण यांना भाजपात घेण्याची रिस्क का घेतली असा सवाल फडणवीसांना केला असता त्यांनी म्हटले, अशोक चव्हाणांवर आरोप झाले ते आमच्या काळात झाले नाही. त्यांच्याच काळात झाले. त्यांच्याच पक्षाने सीबीआय चौकशी केली. चार्जशीट त्यांच्याच सरकारमध्ये झाले. ते हायकोर्टात जिंकले. आता सुप्रीम कोर्टात गेले. त्यांच्या सारखा मजबूत नेता आमच्यासोबत येत असेल तर मराठवाड्यात ताकद वाढेल. का घेऊ नये? असा उपरोधिक सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले की, पहिली गोष्ट तर जे आमच्यासोबत येतात त्यांना घेतो. इतरांचा पास्ट असेल तर ते उतरवण्याची जबाबदारी आमची नाही. ते त्यांनाच न्यायचं आहे. त्यांनाच केस फेस करायचं आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे, लोक आपली शक्ती संघटित करायला तयार असतील तर आम्ही सोबत घेतो. मोदींच्या नेतृत्वात जमिनीशी जोडलेले नेते येत असतील तर त्यांना सोबत घेतलं पाहिजे असं फडणवीस म्हणाले.