Devendra Fadnavis : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
देवेंद्र फडणवीसांना 5 जूनला कोरोनाची लागण झाली होती.
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा कोरोना रिपोर्ट (Corona test) निगेटिव्ह (Negative) आलाय. देवेंद्र फडणवीस 5 जूनला कोरोना पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान, आज त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पुन्हा फडणवीस सक्रिय दिसणार आहेत. फडणवीस यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, त्यांनी आज कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांची घाई आहे. त्यातच फडणवीस हे भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते आहे. मात्र, कोरोना झाल्यामुळे त्यांनी घरीच उपचार घेतले असून ते आता पुन्हा सक्रिय होणार आहेत. यापूर्वी देखील फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती. फडणवीस यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते, मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती.
Published on: Jun 09, 2022 11:47 AM
Latest Videos