“कालपर्यंत सुप्रीम कोर्टाला शिव्या देणारे, आज…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येत आहेत. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
नाशिक, 5 ऑगस्ट 2023 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येत आहेत. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “कोर्ट दबावाखाली काम करतय, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेल नाही. राहुल गांधींनी जे म्हटलंय ते किती अयोग्य आहे, उच्चपदस्थ व्यक्तींनी असे वक्तव्य करू नये, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलय. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे काँग्रेसचे नेते कालपासून सर्वोच्च न्यायालयाचे गुणगान गात असल्याचं पाहून याचे समाधान वाटतं. आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगलं, आणि आमच्या विरोधात निर्णय गेला तर सुप्रीम कोर्ट वाईट.भारतीय संविधानाने तयार केलेल्या अशा संस्थांना हे लोक कशा पद्धतीने नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सिद्ध झालं आहे”