आता उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय?, कर्नाटक सरकारच्या 'त्या' निर्णयावरून फडणवीसांचा सवाल

“आता उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय?”, कर्नाटक सरकारच्या ‘त्या’ निर्णयावरून फडणवीसांचा सवाल

| Updated on: Jun 16, 2023 | 3:47 PM

कर्नाटकमध्ये काँग्रेसते सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत अभ्यासक्रमातील सावरकरांचा धडा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भाजप सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. यानंतर आता भाजपाकडून यावर सडकून टीका होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

मुंबई : कर्नाटकमध्ये काँग्रेसते सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत अभ्यासक्रमातील सावरकरांचा धडा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भाजप सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. यानंतर आता भाजपाकडून यावर सडकून टीका होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली.”एखादा धडा तुम्ही अभ्यासक्रमातून वगळू शकता, मात्र ते लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत. ते लोकांच्या मनातून एकही स्वातंत्र्यसंग्रामी काढू शकत नाही. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्यासाठी कर्नाटकचं सरकार निर्णय घेत आहे.माझा मविआला सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हणत आहेत तो हाच आहे का? माझा एक प्रश्न उद्धव ठाकरेजींना आहे. आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते जर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघालेले आहेत, धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत तर आता तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. सत्तेसाठी तुम्ही समजोता केला हे यातून अतिशय स्पष्ट होत आहे. हे असे निर्णय घेतल्याने ते कोणाचंही नाव जनतेच्या मानसपटलावरुन पुसू शकणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Published on: Jun 16, 2023 03:47 PM