हनुमान चालिसा पाकिस्तानात म्हणायची का? देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणावर?
अशी एक तरी व्यक्ती दाखवा जिनं हनुमान चालिसा म्हटलं आणि त्याला १४ दिवस जेलमध्ये जावं लागलं. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरे एक सवाल करायचा आहे, हनुमान चालिसा भारतात नाहीतर काय पाकिस्तानात म्हणायची का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हनुमान चालिसा भारतात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला. तर हनुमान चालिसा म्हटल्यानं जेलमध्ये गेलेली एकतरी व्यक्ती दाखवा, असं वक्तव्य म्हणत हनुमान चालिसा प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘अशी एक तरी व्यक्ती दाखवा जिनं हनुमान चालिसा म्हटलं आणि त्याला १४ दिवस जेलमध्ये जावं लागलं. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरे एक सवाल करायचा आहे, हनुमान चालिसा भारतात नाहीतर काय पाकिस्तानात म्हणायची का? ‘, असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सवाल केला. पुढे त्यांनी असेही म्हणाले की, नवनीत राणांच्या विरोधात कुणी कितीही बोलले, तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कुणी कितीही दुषणे दिली, तरी त्याची चिंता करू नका. त्यांना हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे.