‘कोरोनात क्लास बंद आणि ग्लास सुरु होते!’- Devendra Fadanvis

| Updated on: Mar 24, 2022 | 7:23 PM

प्रश्न विचारायला अक्कल कुठे लागते या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल करत महाविकास आघाडीचे वाभाडे काढले. तसेच अक्कलेचा प्रश्न असेल तर मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार प्रश्न विचारणे ही आमची चूक झाली. यावेळी त्यांनी क्लास बंद, ग्लास सुरु, असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीचा तीन नावात निकाल लावला.

मुंबईः आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakceray) हे असं म्हणतात की, प्रश्न विचारायला अक्कल कुठे लागते. आता आम्हाला हे माहितीच नव्हतं. आम्ही वीस बावीस वर्षे तारांकित प्रश्न वगैरे विचारत बसलो. मात्र अनेकांना प्रश्न उपस्थित केले म्हणून संसदरत्न पुरस्कार मिळाला असल्याचा टोला अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडला लगावला. प्रश्न विचारायला अक्कल कुठे लागते या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल करत महाविकास आघाडीचे वाभाडे काढले. तसेच अक्कलेचा प्रश्न असेल तर मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार प्रश्न विचारणे ही आमची चूक झाली. यावेळी त्यांनी क्लास बंद, ग्लास सुरु, असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीचा तीन नावात निकाल लावला.