VIDEO : Devendra Fadnavis | सरकारी भरतीचा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही- फडणवीस
सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टिका केली आहे.
पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत पोहचले आहेत. आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ सुरू आहे. मध्यरात्री परीक्षा रद्द करण्यात आली. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टिका केली आहे. फडणवीसांनी पुढे ट्विटरमध्ये लिहिले की, आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय ! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका! दोषींवर कठोर कारवाई कराच, पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही.
Latest Videos