उद्धव ठाकरे, काँग्रेसला माफी मागायला लावणार का? फडणवीसांचा एकच सवाल अन् उबाठाची कोंडी

मालवणातील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी राज्यात महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी मविआ नेत्यांनी महायुती सरकारचा निषेध केला. यानंतर उपमुख्यमंत्री अन् भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केला.

उद्धव ठाकरे, काँग्रेसला माफी मागायला लावणार का? फडणवीसांचा एकच सवाल अन् उबाठाची कोंडी
| Updated on: Sep 01, 2024 | 2:04 PM

नेहरूंनी शिवाजी महाराजांच्याबद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडियात जे लिहिलंय त्याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का? असा थेट सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी उबाठा सेनेला अडचणीत आणले आहे. फडणवीस पुढे फडणवीस असेही म्हणाले, मध्यप्रदेशात काँग्रेसने बुलडोझर लावून शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला त्यावर पवार ठाकरे मूग गिळून बसले आहेत. त्यावर का बोलत नाही कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने महाराजांचा पुतळा हटवला. त्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. आधी त्याचं उत्तर दिलं पाहिजे, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला. तर इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं महाराजांनी सुरत लुटली. महाराजांनी सुरत लुटली नव्हती तर तो खजिना घेऊन योग्य त्या लोकांना दिला होता. हा स्वराज्याचा खजिना होता. त्यांनी आक्रमण केलं होतं. पण त्यांनी लूट कधी केली नव्हती. महाराज काही लूट करायला गेले नव्हते. पण असा इतिहास आम्हाला दाखवला गेला. इतकी वर्ष काँग्रेसने हा इतिहास शिकवला त्याची काँग्रेसला माफी मागायला सांगणार आहात की त्यांचं मिंधेपण स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे, असा खोचक टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.