Devendra Fadnavis | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, देवेंद्र फडणवीस यांची सरकारकडे मागणी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं आवाहनच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मुंबई : मराठवाड्यात पूरस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं आवाहनच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तीन ट्विट केले आहेत. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Latest Videos