Devendra Fadnavis | दिल्लीतल्या बैठकीवर पत्रकारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं नो कमेंटस
नवी दिल्लीत अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीविषयी विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देणं टाळलं, त्यामुळं त्या बैठकीत नेमक काय घडलं याबाबात उत्सुकता वाढलीय.
विरोधकांकडून ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मूळ गावी मूल येथे आज आले होते. परत जाताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर घडविले जात आहे, असा आरोप होतोय. त्यात कितपत तथ्य आहे? असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडविण्यात येत असल्याच्या वार्ता केवळ आरोप असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. नवी दिल्लीत अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीविषयी विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देणं टाळलं.
Latest Videos