Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 17, 2023 | 10:15 PM

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. ज्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.

मुंबई : ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे राज्यभरात शिंदे गटाकडून जल्लोष सुरु झाला आहे.या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारावर चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो हीच खरी शिवसेना. कारण ही विचांराची शिवसेना (Shiv Sena)  आहे. हा विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. खाजगी मालमत्ता म्हणून कोणी शिवसेनेवर अधिकारी सांगू शकत नाही. बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे तीच खरी शिवसेना. आज जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला त्याने यावर शिक्कामोर्तब झाला’

‘याआधी ही निवडणूक आयोगाने ( Election Commission ) अशाच प्रकारे निर्णय दिले आहेत. मी मनापासून एकनाथ शिंदे यांचं आणि शिवसेनेचं अभिनंदन करतो. मी  काही दिवसांआधी बोललो होतो. त्यांच्या बाजुने निर्णय आला तर निवडणूक आयोग योग्य, विरोधात आला तर दबाव. त्यांचे विचार मला माहित आहे. या देशात न्याय आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे.’

 

Published on: Feb 17, 2023 08:35 PM