खासदार अन् आमदारांसह झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिला मोठा कानमंत्र! म्हणाले...

खासदार अन् आमदारांसह झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिला मोठा कानमंत्र! म्हणाले…

| Updated on: Jun 04, 2023 | 1:20 PM

VIDEO | सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी खासदार अन् आमदारांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर भाजपची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतील आमदार, खासदार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावर ही बैठक झाली. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर भाजपची रणनिती ठरल्याचे सांगितले जात आहे. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, अशी सूचना उपस्थित आमदार आणि खासदारांना देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासह मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यावर अधिक भर द्या, ठाकरे सरकारची आणि शिंदे-भाजप सरकारची कामगिरी मुंबईकरांसमोर मांडा त्यांचं मूल्यमापन करा, तर अडीच वर्ष प्रकल्प कसे रखडले आणि आपल्या सरकारने प्रकल्पांना कशी गती दिली हे लोकांना सांगा तर अशा सूचना बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात.

Published on: Jun 04, 2023 01:20 PM