माझ्या माहितीचे स्रोत कुणीही मला विचारू शकत नाही- देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडी सरकारच्या गृहमंत्रालयातील महाघोटाळ्यासंदर्भात मला अशाच चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. उद्या बीकेसी येथील पोलीसांसमोर मी हजर होईन, त्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देईन, असे आश्वासन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहे.
विरोधी पक्ष नेत्याच्या अधिकारातून सत्ताधाऱ्यांचे घोटाळे मी बाहेर काढू शकतो आणि माझ्या माहितीचे स्रोत कुणीही मला विचारू शकत नाही, असा नियम आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकारच्या गृहमंत्रालयातील महाघोटाळ्यासंदर्भात मला अशाच चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. उद्या बीकेसी येथील पोलीसांसमोर मी हजर होईन, त्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देईन, असे आश्वासन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरोधात भाजप असा सामना गेल्या अनेक दिवसांपासून रंगलाय आणि दिवसेंदिवस यातील आक्रमकता वाढत चालली आहे. याचाच एक अंक उद्या मुंबईत पहायला मिळणार आहे. बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला भाजपचे मातब्बर नेते देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाणार असून राजकीय वर्तुळात एक मोठा हाय व्होल्टेज ड्रामा या निमित्ताने होऊ शकतो.