Maharashtra Police Bharti : गृहविभागात जम्बो भरती, 23 हजार 628 रिक्त पदे भरली जाणार; तरुणांनो त्वरा करा
लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन, कर्मचारी आणि युनिट असलं पाहिजे, या संदर्भातील नवीन आराखडा तयार करण्यात आला असून यानुसार रिक्त पदांवर भरती होणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबई, १४ डिसेंबर २०२३ : राज्यातील गृहविभाग 23 हजार 628 रिक्त पदं भरली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली आहे. लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन, कर्मचारी आणि युनिट असलं पाहिजे, या संदर्भातील नवीन आराखडा तयार करण्यात आला असून यानुसार रिक्त पदांवर भरती होणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज पाटील यांनी मांडली होती. याप्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. फडणवीस म्हणाले, गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले आहे. या आराखड्याच्या अंतर्गत 23 हजार 628 पोलीस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे त्यांनी विधान परिषदेत सांगितले.