Devendra Fadnavis | विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत राज्यपाल निर्णय घेतील : देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमात बदल केले आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नागपूर: राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमात बदल केले आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय थेट राज्यपालांच्या कोर्टात दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकी संदर्भात राज्यपालांचे जे अधिकार आहेत. त्याबद्दल राज्यपाल निर्णय घेतीलच. मात्र विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात जे काही बदल केले गेले आहेत ते भारतीय संविधानाला सुसंगत दिसत नाहीत. म्हणून आम्ही आक्षेपही घेतला होता. अशाप्रकारे सर्व अधिकार काढून घ्यायचे आणि लेजिसलेचरमध्ये एक्झिक्यूटिव्हला अधिक महत्व द्यायचे हे योग्य नाही. म्हणून आम्ही त्यास विरोध करतोय, असं फडणवीसांनी सांगितलं.