देवेंद्र फडणवीस म्हणाले, …पण शिंदे अपात्र होत नाहीत, उपमुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी?
tv9 Marathi Special Report | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र झाले तरी विधान परिषदेवर निवडून येणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदावरुनही फडणवीसांनी स्पष्टता आणली आहे.
मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३ | एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. महत्त्वाचं म्हणजे जर एकनाथ शिंदे जर आपत्र ठरले तर एक पर्याय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितलं. यावरून राजकारण देखील चांगलंच रंगलं आहे. मुख्यमंत्री अपात्र होणार नाहीत आणि जर ते झालेच तरीही ते मुख्यमंत्री राहतील आणि ते विधानपरिषदेवर येतील, असा दावा फडणवीस यांनी केलाय. त्यावर शिंदे जर अपात्र झाल्यात भाजपचा प्लान बी तयार आहे का? आणि अजित पवार हे भाजपचा प्लान बी नाहीत का? असं विचारलं असता फडणवीस म्हणाले प्लान बीची गरजच नाही. याच दाव्यावरून फडणवीसांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. बघा कुणी काय केला देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल?
Published on: Oct 30, 2023 11:00 AM
Latest Videos