पुणेकरांना 10 रुपयात गारेगार प्रवास, पुण्यात वातानुकूलित मिनी बसचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

पुणेकरांना 10 रुपयात गारेगार प्रवास, पुण्यात वातानुकूलित मिनी बसचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

| Updated on: Jul 09, 2021 | 3:39 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील वातानूकुलित बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. 10 रुपयांत प्रवास सुरु केला त्याबद्दल पुणे महापालिकेच्या सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

पुणे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील वातानूकुलित बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. 10 रुपयांत प्रवास सुरु केला त्याबद्दल पुणे महापालिकेच्या सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी कल्पकतेने बस सेवा सुरू केली. पुणे पालिकेने पुण्य नगरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतलाय.  पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम करता सुलभता हवी, वेळेची खात्री हवी, त्यासाठी डिजिटल अँप लवकरच सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  बस मध्ये सुलभता हवी, स्वच्छ बस, इलेक्ट्रिक बस घ्या असं सांगितलं होतं. ते पुण्याने करून दाखवलं, देशात सर्वाधिक बस PMP ने करून दाखवलं आहे. लोकांना बसने प्रवासाची सवय झाली पाहिजे.  पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढे देखीलं असंच काम करत राहावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.