Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली तारीख
पुन्हा निवडून आल्यास १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये देणार असं आश्वासन जाहीरनाम्यात महायुतीने दिलं. यावरूनच राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना २१०० रूपये कधी देणार? याची लाडक्या बहिणी वाट बघत आहेत, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणत सरकारला सवाल केला होता.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. यामध्ये लाडक्या बहिणींचं मोठं श्रेय असल्याचे मानले जातेय. कारण निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महायुती सरकारने घोषणा केली. अशातच पुन्हा निवडून आल्यास १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये देणार असं आश्वासन जाहीरनाम्यात महायुतीने दिलं. यावरूनच राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना २१०० रूपये कधी देणार? याची लाडक्या बहिणी वाट बघत आहेत, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणत सरकारला सवाल केला होता. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. सभागृहात फडणवीस म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आम्ही जी आश्वासनं दिलीत, ज्या-ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या सर्व योजना सुरू राहतील. राज्यातील ज्या सर्व लाडक्या बहिणींनी निवडणुकीत महायुती सरकारवर प्रेम दाखवलं. त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकण्यात येणार आहे.’, असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केलं. पुढे देवेंद्र फडणवीस पुढे असेही म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरू केलेली बंद होऊ देणार नाही. या योजनेसाठी कोणतेही निकष बदण्यात आले नाहीत. पण ज्यांची चार-चार खाती उघडली आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे, कारण तो आपला जनतेचा पैसा आहे. त्याचा गैरवापर किंवा योजनेचा चुकीचा वापर होत असेल तर ते समोर आलं पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.