जरांगेंना रात्री उपोषणस्थळी परत आणणारे नेमके कोण? विधानसभेत फडणवीस आक्रमक
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणारच असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. माझं जरांगे पाटील यांच्याशी काहीच देणं-घेणं नाहीये पण जरांगे पाटलांच्या मागील बोलवता धनी कोण हे शोधू काढलं पाहिजे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजास 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही ते स्वीकारण्यास नकार देत मनोज जरांगे पाटील सगेसोयऱ्यांच्या कायद्यावर ठाम आहे. इतकेच नाहीतर संतापलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणारच असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. माझं जरांगे पाटील यांच्याशी काहीच देणं-घेणं नाहीये पण जरांगे पाटलांच्या मागील बोलवता धनी कोण हे शोधू काढलं पाहिजे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. तर मनोज जरांगेंना रात्री उपोषणस्थळी परत आणणारे नेमके कोण? असा सवाल करत कुणी दगडफेक करायला लावली हे आरोपींनीच सांगितलंय…तुम्ही लोकांच्या आया-बहिणी काढणार का? असे एक न् अनेक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केले आहे. बघा नेमकं काय काय म्हटले फडणवीस?