Special Report | मंत्री नवाब मलिक यांच्या मागे NIA, ED लागणार का?
मुंबईत 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या सरदार शाह वली खान हे सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्या आरोपावरुन दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. त्यानुसार अखेर फडणवीसांनी आज बॉम्ब फोडलाय. मुंबईत 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या सरदार शाह वली खान हे सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर टायगर मेमनच्या नेतृत्वात बॉम्ब कुठे ठेवायचे याची रेकी केली होती. तसंच मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरणारे हे होते. तसंच त्यांना या स्फोटाप्रकरणी संपूर्ण माहिती होती. दुसरे व्यक्ती सलीम पटेल. हा सलीम पटेल म्हणजे एका इफ्तार पार्टीत आर. आर. पाटील यांच्यासोबत फोटो आला. त्यावरुन त्यांना ट्रोल केलं गेलं होतं. हा सलीम पटेल म्हणजे हसिना पारकरचा प्रमुख माणूस. त्याच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी तयार व्हायच्या, अशी माहिती फडणवीसांनी दिलीय.