रेशनवरील तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

रेशनवरील तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

| Updated on: Jul 12, 2021 | 9:38 AM

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या गंभीर आरोपावर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. या घोटाळ्यात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी, राईस मिलचे मालक अडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या गंभीर आरोपावर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Devendra Fadnavis makes serious allegations rice scam on ration against Mahavikas Aghadi government)