खातेवाटपाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, म्हणाले तुम्ही जे खातेवाटप केलंय ते सपशेल चुकीचं ठरेल

खातेवाटपाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, म्हणाले “तुम्ही जे खातेवाटप केलंय ते सपशेल चुकीचं ठरेल”

| Updated on: Aug 11, 2022 | 11:48 PM

खातेवाटपात बरेच बदल दिसतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आता खातेवाटप कधी होणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

खातेवाटपात बरेच बदल दिसतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आता खातेवाटप कधी होणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “तुम्ही तर करून टाकलं. आता आमच्याकरिता खातेवाटप शिल्लकच ठेवलं नाही. माध्यमांनीच खातेवाटप करून टाकलाय. पण तुम्ही जे खातेवाटप केलंय ते सपशेल चुकीचं ठरेल एवढंच सांगतो.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 जणांचा समावेश करण्यात आला.

Published on: Aug 10, 2022 01:15 PM