“…म्हणून एकनाथ खडसे यांच्यावर काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली”, देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन आज जळगावमध्ये करण्यात आलं आहे. या कार्यक्रमावरून शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन आज जळगावमध्ये करण्यात आलं आहे. या कार्यक्रमावरून शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणाची धरपकड करण्याची गरज नाही. काळे झेंडे दाखवून काय मिळणार आहे. खडसेंच असं झालं आहे, त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे. नवीन मालकाने सांगितलं तसं ते वागतात. जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळ केलं नसतं, तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती. ते परिवारतच राहिले असते. काळ्या झेंड्याना घाबरणारे आम्ही लोक नाही. आम्ही जनतेचे लोक आहोत. जळगावची जनता आमच्यासोबत आहे,” असं फडणवीस म्हणाले.

बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...

कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?

भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी

...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
