Devendra Fadnavis Tweet | बंगळुरुतील घटनेचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निषेध

Devendra Fadnavis Tweet | बंगळुरुतील घटनेचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निषेध

| Updated on: Dec 18, 2021 | 9:49 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कर्नाटकातील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करुन या घटनेचा निषेध केलाय. ‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच’, असं फडणवीस म्हणाले.

कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कर्नाटकातील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करुन या घटनेचा निषेध केलाय. ‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच’, असं फडणवीस म्हणाले.

‘आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत.त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच! ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच!’ असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.