Devendra Fadnavis : मीरा बोरवणकर यांच्या अजितदादांवरील आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाले…
VIDEO | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या 'मॅडम कमिश्नर' या पुस्तकाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. या पुस्तकातील एका जमीन व्यवहाराच्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्यासंबंधित चर्चांना उधाण आलं आहे. बोरवणकर यांनी अजितदादांवर गंभीर आरोप केलेत
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचं ‘मॅडम कमिश्नर’ हे पुस्तक आल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पुस्तकात पोलीस दलातील कारकिर्दीतील आलेले अनुभव मीरा बोरवणकर यांनी मांडले आहे. या पुस्तकातून त्यांनी अजितदादांवर गंभीर आरोप केले आहे. मीरा बोरवणकर यांच्या 288 पानांच्या या पुस्तकातून त्यांनी येरवडा भूखंड लिलावाची सविस्तर माहिती दिली आहे. पुस्तकात एकूण 38 प्रकरणं आहेत. या पुस्तकातून राज्यातील तत्कालीन राजकीय परिस्थितीही मांडली आहे. एका दादा मंत्र्याने आपल्याला येरवडा भूखंड लिलावाची प्रक्रिया पार पाडण्यास सांगितल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, अजितदादांवर करण्यात आलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित दादांनी पहिल्यांदा भाष्य केले आहे. ते म्हणाले, मला त्याची कल्पना नाही. मी त्यांचे पुस्तक वाचलं नाही. त्याची कुठलाही माहिती माझ्याकडे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.