Devendra Fadnavis | अधिकाऱ्यांना टार्गेट करणं योग्य नाही, फडणवीसांचा मलिकांवर हल्लाबोल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दादरा नगर-हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
ड्रग्ज प्रकरणात अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. तसेच या प्रकरणातील जे साक्षीदार आहेत. त्यांची विश्वासहार्यता संपुष्टात आल्यास नंतर कोणताही साक्षीदार साक्षीसाठी परत येणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दादरा नगर-हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मी यावर फार भाष्य करणार नाही.पण माझे मत आहे की, अधिकाऱ्यांना धमकी देणे हे बरोबर नाही. जे साक्षीदार त्यांची विश्वासहर्ता संपेल अशी कारवाई झाल्यास पुढे कोणी साक्ष देण्यास पुढे येणार नाही. पण मी मानतो की काही आरोप लागले आहेत तर एनसीबीनेही त्याची चौकशी करावी, असं फडणवीस म्हणाले.
Latest Videos