ज्यांनी चूक केली असेल तर... , देवेंद्र फडणवीस यांची काय दिला सूचक इशारा

ज्यांनी चूक केली असेल तर… , देवेंद्र फडणवीस यांची काय दिला सूचक इशारा

| Updated on: Mar 05, 2023 | 2:57 PM

VIDEO | 9 राज्यातील विरोधीपक्ष नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया?

अमरावती : भारतीय जनता पक्षाचे सरकार हे यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं पत्र 9 राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच लिहिलेले आहे, यावर अमरावतीत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, कोणत्याही यंत्रणांचा गैरवापर होत नसून ज्यांनी गैरमार्गाने पैसे कमावलेले आहेत त्यांच्यावरच कारवाई होत आहे, न्याय मिळत नसेल तर न्यायालय आहे, विरोधी पक्ष नेत्यांनी यंत्रणांचा असा गैरवापर झाला असल्यास ते उदाहरण दाखवावे असे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर विरोधी पक्षातून भाजपमध्ये कोणी प्रवेश केला तर त्यांची चौकशी बंद होते कुणाचीही चौकशी बंद झाली नाही असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Published on: Mar 05, 2023 02:56 PM